बोलणारा पोपट


 बोलणारा पोपट 🦜 

आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर एक वृद्ध दाम्पत्य रहायचं. त्यांच्याकडे एक बोलणारा पोपट होता. त्याचा पिंजरा असा ते खिडकीत टांगायचे की त्याला खाली रस्त्यावरून येणारे जाणारे सर्व दिसतील. तो पोपट फार चावट होता..तो त्याला दिसेल त्या प्रत्येकाला ए टकल्या, ए पोटल्या, ए काळया अशा हाका मारायचा. तो मुली आणि बायकांना पण सोडायचा नाही.. ए झिपरे, ए नटवे, ए गावठी अशा हाका मारायच्या..कधी कधी ए चिकने, ए माल असे कौतुक पण करायचा..बिल्डिंगमधले सर्व त्या पोपटाच्या बोलण्याने त्रस्त झाले होते..एक दोन वेळा त्यांनी वृद्ध आजोबांना समज पण दिली होती पण हे काही थांबत नव्हते.

आणि अचानक एक दिवस त्या आजोबांचे निधन झाले. पाहुणे निघून गेले..आजी पुन्हा पिंजरा खिडकीत टांगू लागल्या..पण आता मात्र पोपटाचे बोलणे बंद झाले होते त्याची वाचा आजोबांसोबत निघून गेली..

स्वामी

(संकलित)

टिप्पण्या