पोस्ट्स

ती

इमेज
  ती ती साधारण साठीतली स्त्री. राहणीमान मध्यमवर्गीय. दादर सारख्या उच्चभ्रू वस्तीत स्वतःचे घर आणि घर घेताना घराएव्हढी मोट्ठी टेरेस आवर्जून व खूप शोधून घेतलेली. कारण तिची बागकाम, फुलं, पक्षी यांची प्रचंड आवड. तशी तिने पुढाकार घेऊन बिल्डिंग भोवती भरपूर फुलांची व इतर झाडे लक्ष देऊन लावली. पण तिच्या घरासमोरील टेरेस मधील तिने फुलवलेली बाग एकमेवद्वितीय. विविध नर्सरीत जाऊन तिने आणलेली रोपं आज विविधरंगी फुले लेवून खूप आनंदाने डोलत आहेत. आणि या फुलांवर व झाडांवर खेळायला विविध पक्षी नेहमी हजेरी लावत. त्या पक्षांसाठी एक कारंजे व खाण्याचे भांडे कायम भरून ठेवलेले असे. आणि या टेरेसवर एका कोपऱ्यात आराम खुर्चीत बसून हा पक्षांचा खेळ बघत रमून जायची ती. या पक्षांमध्ये पण तिची सर्वात आवडती होती एक चिमणी. ती चिमणी तर पूर्ण टेरेसभर बागडायचीच पण धीटपणे तिच्या जवळ येऊन पण बसायची. मागील वर्षी ती चा नवरा अचानक वारल्या नंतर तिचा बागेत बसणे हाच छंद होता. तशी ती उच्च विद्याविभूशीत होती. दोन वर्षांपूर्वी मंत्रालयातून रिटायर झाली होती. पण दोन महिन्यांपासून तिच्या बिल्डिंग च्या शेजारील प्लॉट वर बांधकाम सुरु झाले. ...

आई

इमेज
आई  कालचीच गोष्ट.. रेल्वे स्टेशनवर मी मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट पहात उभा होतो. एक हट्टा कट्टा तरुण एका वयस्कर स्त्री व अजून एका तरुण मुलासोबत माझ्या शेजारी येऊन थांबला. तरुणाजवळील सामान व त्याच्या  पिळदार शरीरयष्टी वरून तो मिलिटरी जवान वाटत होता. ती बाई बहुतेक त्याची आई असावी. ती सतत त्याच्या केसातून व गालावरून हात फिरवत होती. आई दिसायला अती सामान्य, रंग सावळा उंची साडेचार फूट नऊवारी जुने लुगडं वय अंदाजे 50 पुढे मागे.. त्या तरुणाने सोबत असलेल्या मुलाला आपला मोबाईल दिला व आईसोबत फोटो काढायला सांगितले.. आईने मुलाच्या कंबरे भोवती हात टाकून, तसेच त्याला गोंजारताना दोन तीन फोटो काढले. हे करताना तिच्या चेहेऱ्यावर मुला बद्दलचे कौतुक ओसंडून वहात होते.. तिने मोबाईल घेऊन फोटो कसे आले ते बघितलं.. महत्वाचे म्हणजे स्वतः चा फोटो न बघता तिने मुलाचा फोटो मोठा (zoom) करून पाहिला.. शप्पथ सांगतो मला त्या मुलाचा हेवा वाटला.. आई गरीब असो , दिसायला कशी ही असो आई ती आई असते.तिच्यासारखे निस्वार्थी प्रेम जगात कोणीच करू शकत नाही याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि डोळ्यात अश्रू तरळले. ©आशुतोष 

ती परी अस्मानीची

इमेज
  ती परी अस्मानीची माझा उमेदवारी चा काळ, मी CA होऊन नुकताच एका मध्यम आकाराच्या अकाउंट फर्म मध्ये job ला लागलो. ऑफिस नरिमन पॉईंट ला. मी चर्नीरोड ला रहात असल्याने मला सोयीचे होते. तेव्हा कॉम्पुटर नवीन नवीन होते. खरं तर रविवारी दिवस पूर्ण मजेत घालवल्यावर सोमवारी कामावर जायचा समस्त नोकरदारांप्रमाणे मलाही कंटाळा येणं तसं स्वाभाविक होतं पण मला कधीच तसं वाटलं नाही. मी सोमवारी लवकर उठून पटापट आवरून, छान कपडे घालून लवकरात लवकर ऑफिस ला पोचायचा प्रयत्न करायचो. या सर्व धावपळी चे कारण पण तेव्हढेच खास होते.. किमया.. आमची बॉस.. दर सोमवारी किमया खूप लवकर ऑफिस ला यायची आणि सर्व स्टाफ मेंबर बरोबर खूप प्रेमाने बोलायची.. ऑफिस कामाबद्दल आणि वैयक्तिक खाजगी, घरगुती गप्पा पण.. लवकर गेलो कि तिचा सहवास जास्त मिळायचा.. म्हणून लवकर जायचा आटा पिटा.. तर ही किमया.. नावाप्रमाणेच अतिशय सुंदर, राहणीमान उच्च व आकर्षक.. कपड्यांचा चॉईस व रंगसंगती एकदम रिच.. जे परिधान करेल ते तिच्या साठीच स्पेशल बनवून घेतले आहे असे वाटावे.. लाईट लिपस्टिक, कानातले व हातातले कपड्यांना मॅचिंग...तिचे खळखळून हसणे..एकदम हिरोईन मटेरिअल.. खरं ...

बोलणारा पोपट

इमेज
 बोलणारा पोपट 🦜  आमच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर एक वृद्ध दाम्पत्य रहायचं. त्यांच्याकडे एक बोलणारा पोपट होता. त्याचा पिंजरा असा ते खिडकीत टांगायचे की त्याला खाली रस्त्यावरून येणारे जाणारे सर्व दिसतील. तो पोपट फार चावट होता..तो त्याला दिसेल त्या प्रत्येकाला ए टकल्या, ए पोटल्या, ए काळया अशा हाका मारायचा. तो मुली आणि बायकांना पण सोडायचा नाही.. ए झिपरे, ए नटवे, ए गावठी अशा हाका मारायच्या..कधी कधी ए चिकने, ए माल असे कौतुक पण करायचा..बिल्डिंगमधले सर्व त्या पोपटाच्या बोलण्याने त्रस्त झाले होते..एक दोन वेळा त्यांनी वृद्ध आजोबांना समज पण दिली होती पण हे काही थांबत नव्हते. आणि अचानक एक दिवस त्या आजोबांचे निधन झाले. पाहुणे निघून गेले..आजी पुन्हा पिंजरा खिडकीत टांगू लागल्या..पण आता मात्र पोपटाचे बोलणे बंद झाले होते त्याची वाचा आजोबांसोबत निघून गेली.. स्वामी (संकलित)